Join us

Virat Kohli Shane Watson, IPL 2022: "त्या दिवसापासून विराटमधली ऊर्जा संपल्यासारखी वाटतेय"; ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:56 IST

Open in App
1 / 6

Virat Kohli Shane Watson, IPL 2022: भारताचा आणि RCBचा माजी कर्णधार विराट कोहली सध्याच्या फॉर्मसाठी झगडताना दिसतोय. त्याच्या या कठीण टप्प्याबाबत शेन वॉटसनने आपले मत व्यक्त करताना मोठं विधान केलं.

2 / 6

'दिल्ली कॅपिटल्स बंगलोर विरुद्ध खेळत असताना त्या सामन्यात जो विराट खेळला, तो नेहमीचा विराट नव्हता. त्याच्यात खूप बदल झाल्यासारखा मला वाटला. मी विराटला यापूर्वीही खेळताना पाहिले आहे.'

3 / 6

'मी विराट विरुद्ध खेळलो आहे. त्याच्यासोबतही मी RCB साठी काही वर्षे खेळलो आहे. पण मला असं वाटतंय की आता त्याच्यात खेळाडू म्हणून बदल झालाय. विराटची उर्जा थोडी कमी झालीय असं वाटतंय.'

4 / 6

'विराट जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो, तेव्हा तो नेहमीच खूप उत्साही असतो. तो प्रत्येक वेळी मैदानात असतो, तेव्हा ऊर्जा दिसते. त्याची आक्रमकता मैदानातील खेळात नेहमी दिसते. पण आता त्यात बदल झाल्याचं दिसतंय.'

5 / 6

'टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यापासून विराटमधली ऊर्जा कमी झाल्याचं दिसून येतंय. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात एका आक्रमक खेळाडूसाठी कर्णधारपद सोडून सामान्य खेळाडूप्रमाणे क्रिकेट खेळण्यातला बदल किती विचित्र असू शकतो याची मला कल्पना आहे.'

6 / 6

'या बदलातून बाहेर येण्यासाठी विराटला काही काळ द्यावा लागेल. विराट हा लढाऊवृत्तीचा खेळाडू आहे. त्यामुळे तो साऱ्यावर मात करत लवकरच पुन्हा फलंदाजीच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये परतेल', असा विश्वास शेन वॉटसनने व्यक्त केला.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीशेन वॉटसनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरभारतीय क्रिकेट संघ
Open in App