Join us

"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 11:17 IST

Open in App
1 / 7

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. टी२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर विराट केवळ वनडे क्रिकेट खेळत राहणार आहे.

2 / 7

विराट कोहलीने निवृत्तीबद्दल बीसीसीआयला आधीच कळवल्याची माहिती होती. बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंतीही केली होती. पण अखेर आपल्या निर्णयावर ठाम राहत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

3 / 7

विराटच्या घोषणेनंतर त्याचे जुने सहकारी त्याच्याबद्दल विविध गोष्टी सांगताना दिसत आहेत. त्यातच, विराटचा दिल्ली संघापासूनचा सहकारी इशांत शर्मा याने कोहलीबद्दल एक वेगळाच किस्सा सांगितला आहे.

4 / 7

एका मुलाखतीत बोलताना इशांत म्हणाला, 'आम्ही सुरुवातीपासून एकत्र खेळायचो. आमच्या दोघांचे टीम इंडियातील पदार्पणही जवळपासच झाले. आमचे नाव संघात येईल अशी आशा होती. जेव्हा संघ जाहीर होत होता, तेव्हा माझेही नाव जाहीर झाले.'

5 / 7

'मी तेव्हा झोपलो होतो. विराट माझ्यासोबतच होता. त्याने मला लाथ मारली आणि म्हणाला, तुझं नाव संघात आलंय. तू खरंच टीम इंडियासाठी खेळणारेस? मी झोपेतच होतो. मी त्याला म्हणालो मला झोपू दे. पण विराट खूपच उत्साहात होता,' असे इशांतने सांगितले

6 / 7

'विराट हा बाहेरच्या लोकांसाठी महान असेल, पण माझ्यासाठी तो आमचा 'चिकू'च आहे. आम्ही लहानपणापासून मित्र आहोत. आम्ही अंडर 17 एकत्र खेळलोय. अंडर 19 खेळताना तर आम्ही एकत्रच प्रवास करायचो आणि मिळणारे पैसे आम्ही वाचवून मस्त चटपटीत खायचो.'

7 / 7

'संपूर्ण जगासाठी विराट कोहली ही एक खूप वेगळी व्यक्ती असू शकेल. पण माझ्यासाठी मात्र तो माझा लहानपणापासूनचा मित्रच आहे. आम्ही नेहमीच खूप चांगले मित्र राहिलेलो आहोत,' असेही इशांत शर्मा स्टार स्पोर्ट्सच्या प्रेस मुलाखतीत म्हणाला.

टॅग्स :इशांत शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड