पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग याची फजिती झाली.
या सामन्याचे समालोचन करणाऱ्या पाँटिंगला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याच्यासोबत मेलैन मॅकलॉघलीन ही टीव्ही अँकरही होती.
मेलैन मॅकलऑघलीनवरूनच पाँटिंगची ही फजिती झाली. हे दोघं समालोचन करत असताना एक चाहता त्यांच्याजवळ आला.
त्यानं फोटोची मागणी केली आणि जेव्हा पाँटिंगकडून होकार मिळताच त्यानं त्वरित फोन ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराकडे सोपवला
चाहत्याला मेलैनसोबत फोटो हवा होता आणि त्यानं पाँटिंगला चक्क दोघांचा फोटो काढण्यासाठी फोन सोपवला