सौंदर्यवती आहे भारताच्या या क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड? दक्षिणेतील सिनेमात दाखवते जलवा

Venkatesh Iyer: युवा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर सध्या भारतीय संघाबाहेर आहे. व्यंकटेश हा त्याच्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. त्याच्या पर्सनल लाईफची फारशी चर्चा होत नाही. मात्र आयपीएल २०२२ दरम्यान व्यंकटेश अय्यरचं नाव एका दक्षिणेतील अभिनेत्रीसोबत जोडलं जाऊ लागलं होतं. ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचाही दावा केला जातो.

युवा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर सध्या भारतीय संघाबाहेर आहे. व्यंकटेश हा त्याच्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. त्याच्या पर्सनल लाईफची फारशी चर्चा होत नाही. मात्र आयपीएल २०२२ दरम्यान व्यंकटेश अय्यरचं नाव एका दक्षिणेतील अभिनेत्रीसोबत जोडलं जाऊ लागलं होतं. ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचाही दावा केला जातो.

आयपीएल २०२२ दरम्यान, व्यंकटेश अय्यर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियंका जवालकर यांच्यातील चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्यंकटेश सोशल मीडियावर तितकासा अॅक्टिव्ह नसतो. मात्र त्याने प्रियंकाच्या एका पोस्टवर कमेंट केली होती. तेव्हा ही कमेंट खूप व्हायरल झालं होतं.

२९ वर्षांची प्रियंका जावलकर आंध्र प्रदेशमधील आहे. तिने २०१७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिचा पहिला चित्रपट कला वरम हा होता.

व्यंकटेश अय्यरने केलेल्या कमेंटमुळे दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली होती. प्रियंका जावलकर हिने रिप्लाय देत या चर्चेला हवा दिली होती. अय्यरने प्रियंकाच्या फोटोवर क्यूट असं लिहिलं होतं. अय्यरच्या या कमेंटवर प्रियंकाने उत्तर देताना लिहिलं होतं की कोण? तू?

व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ मध्ये १० सामने खेळताना ४१.११ च्या सरासरीने ३७० धावा कुटल्या होत्या. त्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. २०२२ मध्ये कोलकाताने ८ कोटी रुपयांमध्ये त्यांना रिटेन केलं होतं.

व्यंकटेश अय्यरने भारतीय संघाकडून २ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. त्यांनी या एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ च्या सरासरीने २४ धावा आणि ९ टी-२० सामन्यात ३३.२५ च्या सरासरीने १३३ धावा जमवल्या आहेत. तसेच ५ विकेट्सही घेतले आहेत.