बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौताला अन् क्रिकेटर रिषभ पंत यांच्यातील अफेअरची चर्चा चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती.
उर्वशी रौताला अन् रिषभ पंत यांच्यातील डेटिंग पासून ते दोघांच्यात सोशल मीडियावरील वाद चांगलाच गाजला होता.
फिल्डबाहेरच्या प्रेमाच्या खेळात रिषभ पंत आणि ईशा नेगी यांच्यातील प्रेमाच्या खेळाचीही चर्चा गाजतीये. दोघे एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत अन् एकमेकांच्या पोस्टवर कमेंटही करतात.
एका बाजूला रिषभ पंत आणि ईशा नेगी यांच्यातील गोडी गुलाबीचा सीन दिसत असला तरी क्रिकेटरचं नाव अजूनही रिषभ पंतशी जोडले जाते.
रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांनी आपले मार्ग वेगवेगळे असल्याचे संकेत दिले आहेत. पण त्यातही सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. आता हे फोटो AI च्या कल्पनेतून साकारले आहेत, ही गोष्टही समोर आली.
आता रिषभ पंतसोबतच्या त्या व्हायरल फोटोवर खुद्द अभिनेत्रीनं मजेशीर रिप्लाय दिला आहे.
उर्वशी रौतेला ही 'डाकू महाराज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका मुलाखतीमध्ये तिला रिषभ पंतसोबतच्या व्हायरल फोटोवर प्रश्न विचारण्यात आला होता.
पंतसोबतच्या फोटोवर थेट उत्तर न देता यावर अभिनेत्रीने मजेशीर अंदाजात रिप्लाय दिला. मी सध्या इतकी बिझी आहे की, सुट्टी घेऊन कुणासोबत बाहेर फिरू शकत नाही, असे उत्तर तिने दिले. तिचा हा अंदाज चर्चेचा विषय ठरतोय.