उमेश यादव हा भारताच्या कसोटी संघात आहे.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने ११ विकेट्स घेतल्या होत्या.
सध्या कसोटी सामने नसल्यामुळे त्याला सुट्टी मिळाली आहे.
या सुट्टीमध्ये एका सुंदरीबरोबर समुद्र किनारी फिरताना दिसत आहे.
आता ही सुंदरी आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल
ही सुंदरी दुसरी कोणी नसून उमेशची बायको तानया वाधवा आहे.
उमेश आणि तानया यांचे २९ मे २०१३ ला लग्न झाले आहे.
लग्न होण्यापूर्वी या दोघांचे चार वर्षे अफेअर होते.
उमेश चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला संधी मिळत नव्हती. त्यामुळे तो निराश झाला होता.
उमेशने क्रिकेट सोडायचा विचारही केला होता. त्यावेळी तानयाने त्याची समजूत घातली आणि उमेश पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळला.
उमेश आणि तानया यांना एकमेकांमधील साधेपणा जास्त भावतो.