Join us  

जगातील पाच सर्वोत्तम ट्वेंटी-२० खेळाडूंमध्ये ना विराट, ना रोहित; Shane Watsonने दोन पाकिस्तानी खेळाडूंना निवडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 1:45 PM

Open in App
1 / 8

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला सारे संघ लागले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा हे भारताचे स्टार ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. पाकिस्तानचा बाबर आजम याचा फॉर्म हा प्रतिस्पर्धींची चिंता वाढवणारा नक्की आहे. त्यामुळेच आता वर्ल्ड कप स्पर्धा कोण गाजवतंय याची सर्वांनाचा उत्सुकता आहे.

2 / 8

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉटसन ( Australia great Shane Watson) याला ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडण्याचा टास्क दिला, परंतु त्याने पाचच खेळाडूंची निवड केली. त्याने निवडलेल्या खेळाडूंमध्ये दोन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भारताचे दोन स्टार विराट व रोहित हे त्याच्या यादीत नाहीत.

3 / 8

१६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. भारत-पाकिस्तनाला ग्रुप २ मध्ये ठेवण्यात आले असून २३ ऑक्टोबरला हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.

4 / 8

बाबर आजम ( Babar Azam) - ''सर्वप्रथम मी बाबर आजमची निवड करीन. जागतिक क्रमवारीत तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे आणि वर्चस्व कसे गाजवायचे हे त्याला माहित्येय. फार धोका न पत्करता धावांचा पाऊस कसा पाडायचा हे त्याला योग्यरितीने जमते. ऑस्ट्रेलियात त्याची बॅट बोलणार. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीसाठी त्याने त्याच्या फलंदाजीचे तंत्र विकसित केले आहे,''असे वॉटसन म्हणाला.

5 / 8

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) - ''सूर्यकुमार यादवची फलंदाजी अविश्वसनीय आहे आणि तो माझा दुसऱ्या क्रमांकाची निवड आहे. पण, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये लोकेश राहुलने दमदार कामगिरी केल्यास, मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ऑस्ट्रेलियन कंडिशनचा त्याला चांगला अभ्यास आहे, ''असे वॉटसनने सांगितले.

6 / 8

डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) - वॉटसन म्हणाला, मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या ऑसीसंघाच्या या फलंदाजाने प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटचा किताब पटकावला आणि दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्येही त्याने चांगल्या धावा केल्या आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर तो चौकार-षटकारांची आतषबाजी करेल. त्यासाठी सज्ज राहा.

7 / 8

जोस बटलर ( Jos Buttler) - इंग्लंडच्या जोस बटलरचीही वॉटसनने निवड केली आहे. तो म्हणाला, आयपीएलमध्ये त्याला बाद करणे अवघड झाले होते. आयपीएलच्या एका पर्वात चार शतकं त्याने केली आहेत आणि विराट कोहलीनंतर ( २०१६) असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याची जेव्हा बॅट तळपते तेव्हा त्याला रोखणे अवघड आहे. स्टेडियमवर त्याला हवे तिथे तो चेंडू टोलावू शकतो. बिग बॅशमुळे ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी व कंडिशन त्याला चांगली माहित्येय.

8 / 8

शाहिन आफ्रिदी ( Shaheen Afridi) - पाच खेळाडूंमध्ये वॉटसनने पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदी याची निवड केली आहे. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केल्याचे वॉटसन म्हणाला. पण, सुरुवातीला विकेट घेण्यात तो अपयशी ठरला, तर त्याची लय बिघडेल, याची चिंता वॉटसनला वाटतेय. 1

टॅग्स :शेन वॉटसनट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बाबर आजमसूर्यकुमार अशोक यादव
Open in App