वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हेली हे क्रिकेटविश्वातलं पॉवर कपल म्हणून ओळखलं जात. २०२१ हे वर्ष या ऑस्ट्रेलियन जोडीसाठी खूपच खास गेलं. त्याचा सकारात्मक निकालही त्यांना मिळाला.
वर्षभरातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा (अॅलन बॉर्डर पदक) पुरस्कार मिचेल स्टार्कला जाहीर करण्यात आला, तर वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पुरूषामध्ये मिचेल स्टार्क आणि महिलांमध्ये स्टार्कची पत्नी एलिसा हेली हिला जाहीर करण्यात आला.
एलिसा आणि मिचेल स्टार्क यांचं प्रेम क्रिकेटच्या मैदानातच जुळलं. एलिसाचा जन्म क्वीन्सलँड शहरातला असून ९ वर्षांचे असल्यापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात.
शाळेच्या क्रिकेट संघात असताना दोघांची ओळख झाली. त्यावेळी दोघेही विकेट किपिंग करायचे. तेथून सुरू झालेलं प्रेम २०१५ साली साखरपुड्याच्या बंधनात अडकलं.
मिचेल स्टार्क आणि एलिसा हेली हे दोघे एप्रिल २०१६ साली लगेचच विवाहबद्ध झाले.
एलिसा ही ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटर इयन हेली यांची पुतणी आहे. त्यामुळे क्रिकेटचे धडे तिने लहाणपणापासूनच गिरवले आणि त्यात यशस्वी झाली.
२०२० साली आपल्या पत्नीला वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळताना पाहता यावं यासाठी त्याने आफ्रिकेविरूद्धच्या वन डे सामन्यात माघार घेतली होती.
स्टार्कने मैदानात हजेरी लावताच एलिसाने ३९ चेंडूत ७५ धावांची तुफानी फलंदाजी केली होती आणि संघाला विश्वकरंडक जिंकवून दिला होता.
स्टार्कने मैदानात हजेरी लावताच एलिसाने ३९ चेंडूत ७५ धावांची तुफानी फलंदाजी केली होती आणि संघाला विश्वकरंडक जिंकवून दिला होता.
सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम