Join us

IND vs ENG : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम धोक्यात; इथं पाहा कुणाला आहे नामी संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:54 IST

Open in App
1 / 8

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची द्विपक्षीय टी-२० मालिका खेळणार आहे.

2 / 8

इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरेल. भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत विराट कोहलीचा एक मोठा विक्रम धोक्यात असेल.

3 / 8

इथं एक नजर टाकुयात भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांवर

4 / 8

भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा किंग कोहलीच्या नावे आहे. कोहलीनं इंग्लंड विरुद्धच्या २१ सामन्यात ३८.११ च्या सरासरीनं ६४८ धावा केल्या आहेत. त्याचा हा विक्रम धोक्यात आहे.

5 / 8

भारत-इंग्लंड द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जोस बटलर दुसऱ्या स्थानावर आहे. २२ टी २० सामन्यात ३३.२० च्या सरासरीने बटलरनं ४९८ धावा केल्या आहेत. पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत बटलरला कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी असेल. यासाठी त्याला फक्त १५१ धावा करायच्या आहेत.

6 / 8

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात रोहित शर्मानं १६ टी-२० सामन्यात ३५.९२ च्या सरासरीनं ४६७ धावा केल्या आहेत. रोहित भारत-इंग्लंड द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये.

7 / 8

इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय या यादीत चौथ्या स्थानवार आहे. टीम इंडियाविरुद्धच्या १५ टी-२० सामन्यात त्याने ३५६ धावा काढल्या आहेत.

8 / 8

इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन हा या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियाविरुद्धच्या १६ टी-२० सामन्यात ३४७ धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५विराट कोहलीजोस बटलररोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव