टी२० क्रिकेटमध्ये एका संघासाठी सर्वाधिक धावा, जाणून घ्या टॉप ५ फलंदाजांची नावे!

Most Runs For Team In T20s: टी२० क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत फक्त एकमेव परदेशी खेळाडू आहे.

१) विराट कोहली: लखनौ सुपर जायंट्सविरोधात विराट कोहलीने दमदार अर्दशतक झळकावले. या कामगिरीसह त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. टी२० क्रिकेटमध्ये संघासाठी ९ हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. कोहलीने आतापर्यंत आरसीबीसाठी २८० सामन्यांमध्ये ३९.६० च्या सरासरीने ९ हजार ३० धावा केल्या.

२) रोहित शर्मा: या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत २३४ सामन्यांमध्ये ६ हजार ६० धावा केल्या आहेत.

३) जेम्स विन्स: इंग्लंडचा फलंदाज जेम्स विन्स या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. विन्सने हॅम्पशायरकडून टी-२० क्रिकेटमध्ये २०२ सामन्यांमध्ये ३४.७० सरासरीने ५ हजार ९३४ धावा केल्या.

४) सुरेश रैना: माजी धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने चेन्नईसाठी २०० सामन्यांमध्ये ३३.१० च्या सरासरीने ५ हजार ५२९ धावा केल्या. रैनाने चेन्नईसाठी शेवटचा सामना आयपीएल २०२१ मध्ये खेळला.

५) एमएस धोनी: या यादीत सर्वात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. धोनीने चेन्नईसाठी २७२ सामन्यांमध्ये ५ हजार ३१४ धावा केल्या आहेत.