WPL मध्ये अंबानी नव्हे तर अदांनींच्या संघानं केली सर्वात महागडी शॉपिंग; इथं पाहा Expensive Players ची यादी

WPL मिनी लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण? तिच्यावर किती कोटी रुपयांची बोली लागली?

बंगळुरुमध्ये पार पडलेल्या मिनी लिलावात अंबानी नव्हे तर अदानी फ्रँचायझी संघाने सर्वात महागडी शॉपिंग केल्याचे पाहायला मिळाले.

वुमन्स प्रीमीयर लीग मिनी लिलावात ५ फ्रँयायझी संघांनी काही स्टार क्रिकेटर्सवर मोठी बोली लावत तगडी संघ बांधणी केली.

इथं एक नजर टाकुयात यंदाच्या मिनी लिलावात १ कोटींच्या घरात बोली लालेल्या ४ महागड्या महिला खेळाडूंवर

अदानी समुहाच्या गुजरात जाएंट्स संघानं यंदाच्या मिनी लिलावातील सर्वात महागडी शॉपिंग केली.

धारावीतील झोपडपड्डीत राहणाऱ्या सीमरन शेखसाठी GG संघानं तब्बल १ कोटी ९० लाख एवढी रक्कम मोजली. ही लेग स्पिनर अनकॅप्ड खेळाडू आहे.

WPL मधील सर्वाक महागड्या महिला खेळाडूंच्या यादीत डिआंड्रा डॉटिन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅरेबियन स्टार ऑलराउंडरसाठी गुजरात जाएंट्सच्या संघाने १ कोटी ७० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मोजली.

तामिळनाडूची १६ वर्षीय विकेट किपर बॅटर जी कमलिनीसाठी MI फ्रँचायझी संघानं तब्बल १ कोटी ६० लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

प्रेमा रावत ही १ कोटीच्या क्लबमध्ये बोली लागलेल्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं तिच्यासाठी पर्समधून १ कोटी २० लाख रुपये खर्च केले.

स्मृती मानधना ही WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू आहे. २०२३ च्या WPL लिलावात RCB च्या संघाने तिच्यासाठी ३ कोटी ४० रुपये मोजले होते.