Join us

जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:07 IST

Open in App
1 / 11

सर्वाधिक कसोटी विजय - भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१४ ते २०२२ या कालावधीत एकूण ६८ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आणि त्यांपैकी एकूण ४० सामन्यात विजय मिळवला आहे, तर १७ सामने अनिर्णित राहिले आहेत. कोहली वगळता, इतर कुठल्याही भारतीय कर्णधाराला ३० कसोटी सामनेही जिंकता आलेले नाहीत. या बाबतीत एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६० पैकी २७ कसोटी सामने जिंकले आहेत.

2 / 11

कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके - कोहली हा भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके टोकणारा फलंदाज आहे. त्याने कर्णधार म्हणून एकूण २० कसोटी शतके ठोकली आहेत.

3 / 11

सर्वात मोठी खेळी - विराटच्या नावे भारतीय कर्णधार म्हणून सर्वात मोठ्या कसोटी खेळीचा विक्रम आहे. त्याने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद २५९ धावा केल्या होत्या.

4 / 11

सर्वाधिक रेटिंग पॉइंट्स - आयसीसी पुरुषांच्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोहली हा सर्वाधिक रेटिंग अंक मिळवणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने २०१८ मध्ये ९३७ अंक मिळवले होते. त्याचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे.

5 / 11

सर्वाधिक धावा - विराटने भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ६८ कसोटी सामन्यात ५४.८० च्या सरासरीने ५८६४ धावा ठोकल्या आहेत. त्याच्यानंतर धोनीचा क्रमांक लागतो. त्याने ६० कसोटी सामन्यांत ३४५४ धावा केल्या आहेत.

6 / 11

सर्वाधिक द्विशतके - कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके ठोकणारा भारतीय क्रिकेटर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण ७ द्विशतके ठोकली आहेत. तो ओव्हरऑल लिस्टमध्ये संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

7 / 11

कर्णधार म्हणून द्विशतक - कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. त्याने हा पराक्रम ६ वेळा केला आहे.

8 / 11

सर्वाधिक मालिका विजय - कर्णधार म्हणून कोहलीने सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याने हा पराक्रम एकूण ९ वेळा केला.

9 / 11

ऑस्ट्रेलियात शतकांचा विक्रम - विराट कोहली हा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ७ शतके झळकावली आहेत.

10 / 11

पहिला आशियाई कर्णधार कोहली हा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा आशिया खंडातील पहिला कर्णधार आहे. त्यांनी २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकून इतिहास रचला.

11 / 11

विराट कोहली...

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ