टीम इंडियामधील धडाकेबाज खेळाडूंमध्ये ईशान किशनचा समावेश होतो. इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एक मॉडेल आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
अदिती हुंडिया २०१७ मध्ये फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. तसेच तिने २०१८ मध्ये मिस सुपरनॅशनल इंडियाचा पुरस्कार पटकावला होता. मात्र इशान किशन आणि अदिती यांनी आपल्या नात्याबाबत जाहीरपणे कबुली दिलेली नाही.
अनेक वृत्तांमधून दावा करण्यात आला की, अदिती ही ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे. ईशान किशनसोबत अदितीचे फोटो दोन वर्षांपूर्वी तिच्या जन्मदिनी व्हायरल झाले होते. अदितीला मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांवेळी ईशान किशनला सपोर्ट करताना दिसली होती.
अदितीने इंडिया इंटरनॅशन स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. तर सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं आहे. अदिती पेशाने एक मॉडेल आहे. इन्स्ट्राग्रामवरील तिच्या फोटोवरून दिसून येते.
अदिती तिच्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत असते. तिचे फोटो तिच्या ग्लॅमरची प्रचिती देतात.
आतापर्यंत इशान किशनने आपल्या नात्याबाबत जाहीर वाच्यता केलेली नाही. मात्र मैदानावर इशानने मिळवलेल्या यशाबाबत अदितीने केलेल्या पोस्टमुळे त्यांच्यातील संबंधांना दुजोरा दिला आहे. जेव्हा ईशान किशनने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हा अदितीने आपल्या इन्स्टाग्रामवर त्याला संघाची कॅप देतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.