मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पुत्र अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह गुरुवार ५ मार्च रोजी मुंबईत झाला. यावेळी आजी माजी क्रिकेटपटूंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मुंबईत झालेल्या या शाही विवाह सोहळ्याचे फोटो समोर आले असून, त्यामध्ये तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबीय अगदी रॉयल स्टाईलमध्ये दिसत आहेत.
या लग्नसोहळ्यावेळी तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने असे कपडे परिधान केले होते. ज्यामध्ये पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा अचूक मिलाफ साधलेला होता.
लग्नाच्या खास दिवसासाठी सानिया चंडोक हिने लाल रंगाची भरगच्च नक्षीकाम केलेली सुंदर साढी परिधान केली होती. तसेच ही साडी तिने पारंपरिक नऊवारी शैलीमध्ये नेसली होती. ही साडी तरुण तहिलियानी यांनी डिझाईन केली होती.
अर्जुन तेंडुलकर याने लग्नात मनीष मल्होत्रा याने डिझाईन केलेली गडद लाल रंगाची आणि भरगच्च नक्षीकाम असलेली शेरवानी परिधान केली होती. तसेच या शेरवानीमध्ये तो खूप सुंदर दिसत होता.
अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात त्याची बहीण सारा तेंडुलकर ही सुद्धा खूप सुंदर नटून थटून आली होती. तिनेसुद्धा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली ब्राइट पिंक साडी परिधान केली होती.
मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नात आई अंजली तेंडुलकर यासुद्धा खूप सुंदर अंदाजात दिसल्या. त्यांनी रानी पिंक कलरची साडी परिधान केली होती. त्यावर जुन्या पद्धतीचं सोनेरी नक्षीकाम आणि रुंद सोनेरी काठ होते.
एवढंच नाही तर अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात यजमान सचिन तेंडुलकरसुद्धा खूप खास रूपात दिसला. त्याने क्रीम/आयव्हरी रंगाची बंद गळा असलेली शेरवानी परिधान केली होती. त्यावर सौम्य सिक्वेंस आणि बारीक नक्षीकाम केलेले होते.
अर्जुन आणि सानियाच्या लग्नसोहळ्यामध्ये चंडोक कुटुंबीयसुद्धा खूप रॉयल आणि क्लासी लूकमध्ये दिसले. सानियाच्या कुटुंबीयांनी आपल्या कपड्यांची निवड खूप विचारपूर्वक केलेली दिसत होती. त्यात सानियाच्या वडिलांनी पेस्टल पिंक रंगाचा लांब कुर्ता आणि नेहरू जॅकेट परिधान केले होते.
तर सानियाच्या आईने गोल्डन आणि बेज रंगाची भरगच्च नक्षीकाम असलेली साडी परिधान केली होती. या साडीवर करण्यात आळेलं बारीक नक्षिकाम तिला आणखीनच खास बनवत होतं.
या विवाह सोहळ्यात सानिया चंडोकचा भाऊ पावडर पिंक/पिच शेडसोबत एथनिक आऊटफिटमध्ये खूप डॅशिंग आणि ग्रेसफूल दिसत होता.