Join us

टीम इंडियाच्या स्टार महिला क्रिकेटपटूने गुपचूप केलं लग्न, कोर्ट मॅरेज करत फॅन्सना दिला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 21:56 IST

Open in App
1 / 8

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्तीने गतवर्षी कर्नाटकचा फलंदाज अर्जुन होयसलासोबतचं नातं जाहीर केलं होतं. अर्जुनने वेदाला गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं होतं. या जोडप्याचे तेव्हाचे फोटो व्हायरल झाले होते. आता वेदा आणि अर्जुन यांनी गुपचून कोर्ट मॅरेज करत फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

2 / 8

वेदा आणि अर्जुन यांची लव्हस्टोरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात चर्चेत आली होती. तेव्हा अर्जुनने तिला प्रपोझ केलं होतं. तसेच दोघांनीही हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

3 / 8

आता वेदा कृष्णमूर्तीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुन होयसलासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये वेदा पांढरी सलवार आणि पायजम्यामध्ये दिसत आहे. तसेच तिने गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे. तर अर्जुनने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

4 / 8

वेदा कृष्णमूर्तीने इन्स्टाग्रामवर कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर करत लिहिले की मिस्टर अँड मिसेस, हे तुझ्यासाठी आहे अम्मा. तुझा जन्मदिन नेहमी स्पेशल राहील. लव्ह यू अक्का. जस्ट मॅरिड १२/०१/२०२३.

5 / 8

तर अर्जुनने लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले की, आम्ही दोघांनी मिळून नव्या डावाची सुरुवात करत आहोत.

6 / 8

एकमेकांसोबतचं नातं जाहीर केल्यानंतर वेदा आणि अर्जुन हे एकमेकांचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत होते.

7 / 8

एका फोटोमध्ये अर्जुन वेदाच्या बोटामध्ये अंगठी घातलाना दिसला होता. त्यानंतर क्रिकेटप्रेमींना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत माहिती मिळाली होती.

8 / 8

आता वेदा कृष्णमूर्ती आणि अर्जुन होयसला यांनी गुपचूप विवाह उरकल्याने क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत झाले आहेत. मात्र क्रिकेटप्रेमींकडून दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघलग्न
Open in App