टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना

Star Indian cricket comeback: IPL 2026 लिलावापूर्वी अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत

IPL 2026 लिलावापूर्वी अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा एक स्टार खेळाडूचाही समावेश आहे.

गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळ त्याने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. भारतीय देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा २६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी विदर्भने आपला संघ जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचाही विदर्भच्या संघात समावेश आहे.

उमेश यादव गेल्या वर्षभरापासून फिटनेसच्या समस्यांमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचा शेवटचा सामना खेळला, नंतर तो क्रिकेटपासून दूरच राहिला.

उमेश यादवने गेल्या दोन वर्षांत टीम इंडियाकडून एकही सामना खेळलेला नाही. तो शेवटचा सामना २०२३ मध्ये भारताकडून कसोटीत खेळला होता. तो सध्याही भारतीय संघाचा भाग नाही.

उमेश यादव गेल्या IPL मध्ये सहभागी नव्हता. आता IPL 2026 Auction पूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास तो सज्ज झाला आहे.