खेळाडूंची मैदानावरील मेहनत तर आपण सर्वच जण बघतो, पण टीम इंडियामध्ये एक असा खेळाडूही, आहे ज्याने हा पल्ला गाठण्यासाठी कठोर परिश्रमांसोबतच अनेक अडचणींचाही सामना केला आहे.
या खेळाडूने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीच आपली आई गमावली, वडिलांना सुरक्षा रक्षक म्हणून काम करावे लागले, तर मोठ्या बहिणीने घर सांभाळले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हा खेळाडू जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर्सपैकी एक ठरला आहे.
या खेळाडूचे वडील होते सुरक्षा रक्षक - आजच्या काळात सर जडेजा या नावाने प्रसिद्ध असलेल्या रवींद्र जडेजाला कोण ओळखत नाही. मात्र, जडेजा क्रिकेटर कसा बनला हे आज आम्ही आपल्याला सांगत आहोत. भारताने जागतिक क्रिकेटला एकाचडी एक ऑलराउंडर खेळाडू दिले आहेत. जडेजा हा अलीकडच्या काळातील टीम इंडियाचा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्याची गणना जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर्समध्ये केली जाते.
जडेजाचे (Ravindra Jadeja) बालपण अत्यंत कठीण गेले. त्याचे वडील अनिरुद्ध हे एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक होते. जडेजाने आर्मी ऑफिसर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण जडेजाला क्रिकेटमध्ये रस होता आणि त्याने क्रिकेटमध्ये करिअर केले.
बालपणीच झालं आईचं निधन - जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी गुजराती राजपूत कुटुंबात झाला. जडेजाने क्रिकेटर व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र, त्याची आई त्याला भारतीय संघाच्या जर्सीवर पाहू शकली नाही.
2005 मध्ये जडेजाची आई लता यांचे निधन झाले. यानंतर जडेजाने जवळपास क्रिकेट सोडले होते. पण त्याची मोठी बहीण नयना हिने त्याला साथ दिली आणि संपूर्ण कुटुंबाची काळजीही घेतली. यानंतर जडेजाने पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात केली.
रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) करिअर आतापर्यंत जबरदस्त राहिले आहे. 171 वनडे सामन्यांत जडेजाने 2447 धावा केल्या आहेत. यात 13 अर्द्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने 189 विकेट्सदेखील घेतल्या आहेत.
याशिवाय, 60 टेस्ट मध्ये त्याने 2523 धावा केल्याअसून 242 विकेट्सही घेतल्या आहेत. टी-20 मध्ये जडेजाने 60 सामने खेळले आहेत. यात जडेजाने 379 धावा केल्या असून 48 विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्टइंडीज दौऱ्यासाठी मिळाली मोठी जबाबदारी - रवींद्र जडेजा सध्या टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर रवींद्र जडेजाला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यावर्षी होणार्या आशिया चषक आणि विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही रवींद्र जडेजा टीम इंडियाची पहिली पसंती असणार आहे. रवींद्र जडेजा सध्या बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्हींमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहे.
रवींद्र जडेजा