टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या ब्रेकवर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करण्याच्या तयारीत आहे. हार्दिक पांड्याने २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत (Natasha stankovic) कोर्ट मॅरेज केले होते. त्या दोघांना अगस्त नावाचा एक मुलगाही आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक पुन्हा एकमेकांशी लग्न करणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे जोडपे १४ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये एका भव्य समारंभात पुन्हा एकदा सात फेरे घेतील.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा विवाह सोहळा १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १६ पर्यंत चालणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.
ज्यावेळी हे घडलं तेव्हा सर्वांनीच ग्रँड मॅरेजची कल्पना केली होती. त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या कार्यक्रमात हळद, मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रम होणार आहेत. हे एक व्हाईट वेडिंग होणार असून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याची तयारी सुरू झाली होती.
नताशा स्टॅनकोविकने चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती २०१४ मध्ये बिग बॉसच्या सीझन ८ मध्ये दिसली होती. नताशाने सत्याग्रह, डॅडी आणि फुकरे रिटर्न्समध्ये काम केले आहे. २०१८ मध्ये नताशा शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटात एकाछोट्या भूमिकेत दिसली होती.
२०१९ मध्ये, नताशाने ऋषी कपूर आणि इमरान हाश्मीच्या द बॉडीमध्ये आयटम नंबर केला होता. नताशा स्टॅनकोविक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नताशा तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते.