Asia Cup Final : ट्रॉफीसोबत फोटो काढण्याची हौस! पांड्यानं बाकावर बसलेल्यांसोबत लढवली शक्कल

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेची फायनल जिंकल्यावर ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला, मग...

हार्दिक पांड्या हा पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप फायनलला मुकल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीमुळे त्याच्या जागी रिंकूला संधी देण्यात आली होती.

दुबईच्या मैदानात पाकिस्तानला नमवल्यावर मात्र त्याने संघातील सहकाऱ्यांसोबत हटके अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

फायनल मारल्यावर भारतीय संघाने मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास साप नकार दिला. पण हार्दिक पांड्यानं ट्रॉफी उंचावतानाची खास पोझ देऊन आनंद व्यक्त केला. एवढ्यावरच तो थांबला नाही.

आपल्या आयकॉनिक सेलिब्रेशनसह त्याने ट्रॉफीचा एक खास फोटो शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याने काही खास फोटो शेअर केले आहेत. यात भारतीय टी-२० कर्णधारासोबतची त्याची खास झलक पाहायला मिळते.

आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या तिलक वर्मालाही त्याने जादूची झप्पी दिल्याचे पाहायला मिळाले.

अर्शदीप सिंग आणि हर्षित राणासोबत या फोटोत तो ट्रॉफी उंचावताना दिसतोय. आधी फक्त ट्रॉफी उंचवण्याची ॲक्शन केल्यावर AI च्या माध्यमातून पांड्यानं ट्रॉफीसह फोटो काढण्याची हौस पूर्ण केल्याचे दिसते. बाकावर बसलेल्या मंडळींसोबत मिळून पांड्यानं फोटो काढण्याची हौस पूर्ण केल्याचे या फोटोत दिसून येते.