टीम इंडियाचा टी २० चा कर्णधार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टैनकोविच यांचा विवाहसोहळा व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधून पुन्हा एकदा धुमधडाक्यात पार पडला.
या रॉयल विवाह सोहळ्यात नताशा व्हाईड ड्रेसमध्ये आणि हार्दिक पांड्या सूटमध्ये दिसला. यादरम्यान त्यांच्यासोबत क्रुणाल पांड्या आणि पंखुडी शर्मादेखील उपस्थित होते.
हार्दिक पांड्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या शपथेचा पुनरुच्चार करून आम्ही या प्रेमाच्या बेटावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आमचं प्रेम साजरं करण्यासाठी आमचे कुटुंब आणि मित्र आमच्यासोबत असल्यानं आम्हाला आनंद झाला, असं त्यानं आपल्या फोटोसोबत लिहिलं आहे.
या सोहळ्यादरम्यान, हार्दिक आणि नताशानं आपला मुलगा अगस्त्यसोबतही फोटो क्लिक केला.
सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. तसंच त्यांच्या चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षावही केलाय.
हार्दिक आणि नताशा यांचा विवाहसोहळा उदयपूर येथे पार पडला. भारतीय संघाचा विकेटकिपर इशान किशननंदेखील यावेळी उपस्थित होता.