भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill) यानं सचिन तेंडुलकर याची कन्या सारा हिच्यासोबतच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यानं इंस्टाग्रावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नात्याबद्दल खरं काय ते सांगितले.
कोलकात्याचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांची सोशल मीडियावरील मैत्री सर्वश्रुत आहे.
शुबमनच्या फोटोवरील साराच्या कमेंट्सकडे सर्वप्रथम हार्दिक पांड्याचं लक्ष गेलं. पांड्यानं केलेल्या कमेंटमुळे मग सारा आणि शुबमन 'लक्षवेधी' ठरले.
काही दिवसांपूर्वी सारा आणि शुबमन यांनी एकाच वेळी एकच पोस्ट करून चर्चेला निमित्त दिलं होतं. या दोघांनी ’I spy’ अशी इंस्टाग्राम पोस्ट लिहिली होती.
त्यापूर्वीही गिल यानं कार घेतल्यानंतर सारनं त्याचे अभिनंदन केलं होतं आणि हार्दिक पांड्यानं युवा फलंदाजाची फिरकी घेतली होती.
सोशल मीडियावर गिलला त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल विचारण्यात आले. तू सिंगल आहेस का?; या प्रश्नावर गिलनं होय मी एकटाच आहे आणि नजिकच्या भविष्यात अशी कोणतीच योजना नाही.