क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या नात्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. त्यापैकी काही खऱ्या ठरल्या, तर काही अफवाच ठरले.
एक एक पैलू जोडून क्रिकेटपटू आणि अभिनेत्रीच्या प्रेमाच्या चर्चा रंगवल्या गेल्या. अशीच एक चर्चा बाहुबली फेम तमन्ना भाटीया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू यांच्या प्रेमाची रंगली होती.
दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज अब्दुल रझाक आणि तमन्ना यांचा एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्याप्रमाणे तानियाही पाकिस्तानची सून होणार का? असा प्रश्न तेव्हा सगळ्यांनाच पडला होता.
या फोटोत तमन्ना आणि रझाक एका सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात पाहायला मिळाले होते. त्यावरून ही दोघं लग्नाची तयारी करत असल्याची चर्चा रंगली.
पण, त्यात काहीच तथ्य निघाले नाही. ही दोघं एका ज्वेलरी दुकानाच्या उद्धाटनाच्या निमित्तानं एकत्र आली होती.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे रझाकचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
तमन्नानं या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.
ती म्हणाली होती की,''हे वृत्त चुकीचं आहे. मी लग्न करत नाहीय. माझ्या आयुष्यात ज्या दिवशी कुणी येईल, तेव्हा मी स्वतः तुम्हाला सांगेन.''