२०१६ नंतर होतोय T20 World Cup; जाणून घ्या मागील पाच वर्षांतील टॉप आठ संघांची कामगिरी, कळेल कोण मारणार बाजी!

T20 World Cup: ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्या लढतीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील Round 1चे सामने सुरूवातीला खेळवले जातील आणि २३ ऑक्टोबरपासून Super 12 च्या लढतींना सुरुवात होणार. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष लागून राहिलेय ते विराट कोहली आणि बाबर आजम यांच्या कामगिरीवर... २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान लढत होणार आहे आणि त्यात विराट विरुद्ध बाबर हाही सामना पाहण्याची उत्सुकता आहे. २०१६नंतर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होत असल्यानं कोणता संघ बाजी मारेल, याचा अंदाज बांधला जात आहे. पण, या पाच वर्षांत टॉप आठ संघांच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास अफगाणिस्तान अव्वल स्थानी दिसेल. अफगाणिस्ताननं ८१ टक्के सामने जिंकले आहेत.

अफगाणिस्तान - ३६ सामने, २९ विजय, ६ पराभव, १ बरोबरी, विजयाची टक्केवारी ८१%

पाकिस्तान - ७१ सामने, ४६ विजय, २० पराभव, ५ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी ६५%

भारत - ७२ सामने, ४५ विजय, २२ पराभव, २ बरोबरी, ३ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी ६२.५%

इंग्लंड - ५० सामने, २९ विजय, १९ पराभव, १ बरोबरी, १ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी ५८%

ऑस्ट्रेलिया- ५८ सामने, २९ विजय, २७ पराभव, २ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी ५०%

न्यूझीलंड - ५७ सामने, २७ विजय, २५ पराभत, ३ बरोबरी, २ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी ४७%

श्रीलंका - ५६ सामने, १६ विजय, ३८ पराभव, १ बरोबरी, १ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी २९%

वेस्ट इंडिज - ६७ सामने, २४ विजय, ३६ पराभव, ७ अनिर्णीत, विजयाची टक्केवारी ३६%

दक्षिण आफ्रिका - ५१ सामने, २७ विजय, २३ पराभव, १ बरोबरी, विजयाची टक्केवारी ५३%

बांगलादेश - ५० सामने, २१ विजय, २९ पराभव, विजयाची टक्केवारी ४२%