Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: पाकिस्तान पहिल्याच फेरीत होऊ शकतो OUT; टीम इंडिया करू शकते 'खेळ खल्लास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:32 IST

Open in App
1 / 7

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० वर्ल्डकप २०२६च्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला. इशान किशनच्या ७७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला.

2 / 7

भारतीय संघाने ३ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला. आता भारताचा उरलेला एक सामना नेदरलँड्सशी होईल. पण रंजक बाब अशी की, पाकिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य भारताच्या हाती येऊ शकते.

3 / 7

नेदरलँड्स आणि अमेरिका या दोन संघांचा पराभव करून पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती, पण भारताविरूद्ध त्यांचा पराभव झाला. आता त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नामिबियाशी होणार आहे.

4 / 7

पाकिस्तानी संघाशी नामिबियाचा सामना १८ फेब्रुवारीला दुपारी होणार आहे. या सामन्यात जर उलटफेर होऊन नामिबियाने पाकिस्तानले हरवले, तर पाकिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य भारतीय संघ ठरवेल.

5 / 7

झिम्बाब्वेने जसा ऑस्ट्रेलियाचा आश्चर्यकारक पराभव केला, तसेच नामिबियाने पाकिस्तानला हरवल्यास सर्व सामन्यांनंतर नामिबिया २ तर पाकिस्तान ४ गुणांवर राहिल. मग पाकिस्तानला भारतावर अवलंबून राहावे लागेल.

6 / 7

त्याच दिवशी संध्याकाळी असलेल्या भारत-नेदरलँड्स सामन्यात भारताचा संघ काही कारणास्तव हरला, तर नेदरलँड्स ४ गुणांवर पोहोचेल आणि नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तानला बाहेर ढकलून सुपर-८ मध्ये प्रवेश करेल.

7 / 7

म्हणजेच, पाकिस्तानने स्वत:चा सामना न जिंकल्यास त्यांना भारताच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. आणि जर भारताने 'स्मार्ट गेम' केला तर पाकिस्तान स्पर्धेतून बाद होऊन नेदरलँड्स पुढल्या फेरीत दिसू शकेल.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ