कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ यष्टीरक्षकांमध्ये 'टफ-फाईट'

Team India: T20 World Cup 2024 साठी IPL 2024 ही रंगीत तालीम मानली जात आहे. याच स्पर्धेच्या कामगिरीवर भारतीय संघाची निवड करण्यात येईल.

Team India Squad for T20 World Cup 2024: भारतात सध्या IPL 2024 सुरू आहे. विश्वचषकासाठी IPLही रंगीत तालीम मानली जाते. याच स्पर्धेच्या कामगिरीवर भारतीय संघाची निवड करण्यात येईल.

भारतात प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असल्याने संघात १४-१५ खेळाडू निवडणे ही मोठी कसोटी आहे. अशातच दिनेश कार्तिकच्या फॉर्ममुळे इशान किशन-केएल राहुलचे टेन्शन वाढल्याची परिस्थिती आहे. पाहूया टीम इंडियात विकेटकिपरच्या शर्यतीत असलेले ५ खेळाडू...

कार अपघातानंतर तंदुरुस्त होऊन परतलेला रिषभ पंतही शर्यतीत परतला आहे. तो विकेटकीपिंग करतोय. तसेच, पंतने आतापर्यंत स्पर्धेत ६ सामन्यांत १९४ धावाही केल्या आहेत. यात पंतची २ अर्धशतके समाविष्ट आहेत. तसेच, तो १५३च्या स्ट्राइक रेटने धावा करतोय ही त्याची जमेची बाजू आहे.

दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) सर्वोत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावत आहे. कार्तिकने SRH विरुद्ध 35 चेंडूत 83 धावा तर मुंबईविरुद्ध 23 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आतापर्यंत ७ पैकी ६ डावांत २२६ धावा केल्या आहेत. कार्तिकला विश्वचषकात फिनिशरची भूमिका चोख बजावू शकतो.

लखनौचा कर्णधार, यष्टीरक्षक केएल राहुल या हंगामातही चांगली फलंदाजी करत आहे. त्याने ६ सामन्यात ३४च्या सरासरीने २०४ धावा केल्या आहेत. यात राहुलच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. पण त्याचा स्ट्राइक रेट १३९ असल्याने इतरांच्या तुलनेत ही बाब त्याच्यासाठी चिंतेची ठरू शकते.

युवा खेळाडूंपैकी इशान किशनची बॅट चांगली कामगिरी करत आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशानने आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३१च्या सरासरीने १८४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १७८.६४ आहे. पण त्याला ईशानला आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनदेखील यंदा चांगल्या फॉर्मात आहे. त्याने ६ डावांत ६६च्या सरासरीने २६४ धावा केल्या आहेत. त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, नाबाद ८२ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे कामगिरी आणि वय याचा विचार केल्यास संजू सॅमसनदेखील संघात जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.