Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela च नव्हे, तर भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' तरुणींमुळे लागले चार चाँद! Photo

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुपारी अडीच वाजल्यापासून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी जमू लागली होती. ट्वेंट-20 वर्ल्ड कपनंतर जवळपास दहा महिन्यांनी उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळणार होते. त्यामुळे सर्वांना उत्सुकता होती. प्रेक्षकांची उत्कंठा अखेरच्या षटकापर्यंत ताणली गेली असा हा सामना रोमहर्षक झाला. या सामन्याला बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले, पण तिच्यासह काही ग्लॅमरस चेहऱ्यांना कॅमेरामनने अचूक टिपले...

India vs Pakistan या सामन्याला बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले, पण तिच्यासह काही ग्लॅमरस चेहऱ्यांना कॅमेरामनने अचूक टिपले...

बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ४ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत भुवनेश्वर कुमारने संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. त्याने चारवेळा अशी कामगिरी करताना जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया) व मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानच्या उम्रान गुलने ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत भुवनेश्वर कुमारने ८ विकेट्ससह अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पांड्या ( ७), इऱफान पठाण ( ६), अशोक दिंडा ( ४) व रवींद्र जडेजा ( ४) हे त्याच्या मागोमाग आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या जलदगती गोलंदाजांनी प्रथमच सर्वच्या सर्व १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भुवीने ४ ( २६ धावा ) , अर्षदीप सिंगने २ ( ३३ धावा), हार्दिक पांड्याने ३ ( २४ धावा) व आवेश खानने १ ( १९ धावा) विकेट घेतली.

हार्दिकने ३, अर्षदीप सिंगने २ व आवेश खानने १ विकेट घेतली. ट्वेंटी-२०त प्रथमच सर्वच्या सर्व १० विकेट्स भारतीय जलदगती गोलंदाजांनी घेण्याचा विक्रम केला. ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला.

प्रत्युत्तरात भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या ( गोल्डन डक) रुपाने पहिला धक्का दिला. रोहित शर्मा ( १२) व विराट ( ३५) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ( १८) ३१ धावा जोडल्या. हार्दिक व जडेजाने २९ चेंडूंत ५२ धावा चोपून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला.

अखेरच्या षटकात ७ धावा हव्या असताना जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.