Asia Cup Winner Indian Captains : सूर्यकुमार यादव थेट MS धोनीच्या पंक्तीत

MS धोनीनंतर टी-२० आशिया कप स्पर्धा जिंकणारा सूर्यकुमार भारताचा दुसरा कर्णधार ठरलाय.

१९८४ मध्ये पहिली वहिली आशिया कप स्पर्धा ही UAE च्या मैदानातच पार पडली होती. लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखील भारतीय संघाने पहिला हंगामत गाजवला होता.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुबईच्या मैदानात पाकिस्तानला पराभूत करत नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी स्पर्धा जिंकली. MS धोनीनंतर टी-२० आशिया कप स्पर्धा जिंकणारा सूर्यकुमार हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.

इथं एक नजर टाकुयात आतापर्यंत भारतीय संघाने कधी अन् कुणाच्या नेतृत्वाखाली जिंकलीये आशिया कप स्पर्धा त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

१९८८ मध्ये भारतीय संघाने दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली आशिया कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९९०-९१ आणि १९९५ च्या हंगामात आशिया कप स्पर्धा जिंकली होती.

२०१० आणि २०१६ च्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत आपली खास छाप सोडली होती. धोनी हा वनडे आणि टी-२० दोन्ही प्रारुपातील आशिया कप स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१८ आणि २०२३ मध्ये आशिया कप स्पर्धा जिंकलीये. या दोन्ही हंगामात ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली होती.