टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा याने एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये २०० हून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.
यूएईचा मोहम्मद वसीम १८७ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, सर्वात जलद १५० षटकार मारण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे.
न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मार्टिन गप्टिलने टी-२० क्रिकेटमध्ये १७३ षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलर १७२ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. बटलरला गुप्टिलचा विक्रम मोडण्यासाठी फक्त दोन षटकारांची गरज आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकार मारणारा तो जगातील पाचवा आणि दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे.