मिस्टर IPL स्पेशलिस्ट सुरेश रैना याने क्रिकेटमध्ये आपला काळ गाजवला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा तो पहिला खेळाडू आहे.
MS धोनीच्या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर तो IPL मध्ये MS धोनीआधीच थांबल्याचे पाहायला मिळाले.
क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्यावरही तो क्रिकेटशी कनेक्ट आहे. समालोचकाच्या रुपात त्याने आपल्या नव्या इनिंगची दमदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरही सुरेश रैना तगडी कमाई करणाऱ्या क्रिकेटरपैकी एक आहे. ३९ व्या बर्थडेच्या निमित्ताने जाणून घेऊयात रैनाच्या कमाईची खास गोष्ट
सुरेश रैना याने २०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसह २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०१०-११ मध्ये रैना हा संघातील महत्त्वपूर्ण खेळाडूच्या रुपात बीसीसीआयच्या 'अ' श्रेणीतील करारबद्ध खेळाडूंच्या यादीत सामील झाला. या करारानुसार, त्याचा पगार १ कोटींच्या घरात पोहचला.
IPL २००८ च्या पहिल्या हंगामात सुरेश रैनाला २ कोटी ६० लाख एवढी रक्कम मिळाली होती. चेन्नई सुपर किंग्जशिवाय गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळताना त्याला आयपीएलमधील सर्वाधिक १२ कोटी ५० लाख एवढी रक्कम मिळाली होती. २०२० पर्यंतच्या आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने ११० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
क्रिकेटशिवाय सुरेश रैना कॉमेंट्रीशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून तगडी कमाई करतो. माजी क्रिकेटरच्या नेटवर्थचा आकडा हा २१० ते २१५ कोटींच्या घरात आहे.
क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय स्टाइल स्टेटमेंट आणि तगड्या कमाईच्या आकड्यामुळे तो आजही चर्चेत असतो.
क्रिकेटशिवाय सुरेश रैना कॉमेंट्रीशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून तगडी कमाई करतो. माजी क्रिकेटरच्या नेटवर्थचा आकडा हा २१० ते २१५ कोटींच्या घरात आहे.