आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा ओलांडणे, हे काही निवडक फलंदाजांनाच जमले आहे.
पाकिस्तानचा मोहम्मद रिझवानने सर्वात जलद (७९ डाव) ३ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने २० एप्रिल २०२४ रोजी ही कामगिरी केली. पण सध्या तो पाकिस्तानच्या टी-२० संघातून बाहेर आहे.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी प्रत्येकी ८१ डावांत ३ हजार धावा पूर्ण केल्या. विराटने ही कामगिरी १४ मार्च २०२१ रोजी केली होती, पण आता तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झाला.
पाकिस्तानचा बाबर आझमनेही आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ८१ डाव खेळून तीन हजार धावा केल्या. बाबरने ३० सप्टेंबर २०२२ रोजी हा आकडा गाठला. आता बाबरही पाकिस्तानच्या टी-२० संघाबाहेर आहे. तो परत येईल की नाही, हे अद्याप माहित नाही.
आशिया चषक २०२५ मध्ये खेळणाऱ्या यूएईच्या मुहम्मद वसीमने १५ सप्टेंबर २०२५ रोजी ८४ डावांमध्ये ३ हजार धावांचा टप्पा गाठला. तो आता या खास यादीत सामील झाला आहे.