भारत-नेपाळ यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाल्यास Super 4 मध्ये कोण जाणार?

Asia Cup Super 4 Scenario : भारतीय संघाचा आशिया चषक स्पर्धेतील दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणार आहे.

Asia Cup Super 4 Scenario : भारतीय संघाचा आशिया चषक स्पर्धेतील दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणार आहे. पल्लेकल याच स्टेडियमवर ही लढत होणार, जिथे भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारत-नेपाळ लढत दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होईल.

नेपाळविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ सुपर ४ मध्ये जागा निश्चित करेल. पण, पराभव झाल्यास भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. India vs Nepal यांच्यातल्या लढतीतही पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. अ गटातून पाकिस्तानने १ विजय व १ ड्रॉ निकालासह ३ गुणांची कमाई करून Super 4 मध्ये प्रवेश पक्का केला आहे.

ब गटात श्रीलंका २ गुणांसह आघाडीवर आहे, तर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात शर्यत रंगणार आहे. बांगलादेशला पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली आहे. या गटात कडवी चुरस आहे, परंतु अ गटात भारत-नेपाळ लढतीनंतर चित्र स्पष्ट होईल.

हवामान खात्याच्या माहितीनुसार भारत-नेपाळ लढतीवर पावसाचा अंदाज आहे. दुपारी ३ वाजता पावसाचा अंदाज २० टक्के आहे, तर सांयकाळी ६ पर्यंत ही टक्केवारी ७० पर्यंत जाणार आहे. अशात हाही सामना रद्द होण्याची शक्यता आहे. हाही सामना रद्द झाल्यास, काय होईल?

भारताचा दुसरा सामनाही रद्द झाल्यास त्यांना पुन्हा एका गुणावर समाधानी रहावे लागेल. दोन्ही सामने रद्द झाल्याने भारताच्या खात्यात २ गुण होतील, तर नेपाळच्या खात्यात १ गुण राहिल. नेपाळला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. मग भारत २ गुणांसह सुपर ४ मधील स्थान निश्चित करेल.