Join us

विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:24 IST

Open in App
1 / 7

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत पराभव झाला. पहिल्या सामन्यात पावसाने भारतीय संघाचा घात केला आणि २६ षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली.

2 / 7

दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने दमदार ७३ धावा केल्या. पण तरीही भारताला पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीला मात्र दोन्ही सामन्यात शून्यावर माघारी परतावे लागल्याने चाहते नाराज झाले.

3 / 7

विराट कोहली ज्या प्रकारे दोन्ही डावात बाद झाला, त्यावरून त्याच्यावर काहींनी टीका केली. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही विराटच्या अपयशावर अतिशय रोखठोक मत मांडले.

4 / 7

'अडलेडच्या मैदानावर विराटने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीयांसह ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्याही त्याच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्याला चांगले खेळता आले नाही.'

5 / 7

'अडलेडमध्ये तो फलंदाजीला आला तेव्हा सर्वांनी आनंदाने त्याचे स्वागत केले. तो बाद झाला त्यावेळीही लोकांनी त्याला धीर दिला आणि क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी टाळ्या वाजवल्या.'

6 / 7

'विराट कोहलीच्या बाबतीत पहिल्या दोन सामन्यात जे घडलं त्यावर फारसा विचार करत बसू नका. विराटमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. सिडनीमध्ये तो मोठी खेळी खेळू शकतो.'

7 / 7

'विराट कोहलीच्या १४ हजार धावा, ५२ वनडे शतके, ३२ टेस्ट शतके आहेत. त्याने आतापर्यंत हजारो धावा केल्यात. त्यामुळे दोन डावांत अपयशी ठरण्याची त्याला परवानगी आहे,' असे ते म्हणाले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासुनील गावसकरविराट कोहलीरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ