कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताने तीनशेपार मजल मारली.
विराट कोहलीचे दीडशतक भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
दक्षिण आफ्रिकेकडून जे.पी. डुमिनीने एकाकी झुंज देत 67 धावांची खेळी केली.
अखेर दक्षिण आफ्रिकेचा डाव 179 धावांत आटोपला.