कोलकाता कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाला घरच्या मैदानात १५ वर्षांनी पराभूत केले. संघाच्या विजयात मार्करम याने पार्ट टाइम बॉलरच्या रुपात वॉशिंग्टनच्या रुपात एक विकेट घेत मॅचला कलाटणी दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर मार्करमची पत्नी निकोल डॅनियल हिने खास इन्स्टास्टोरी ठेवत आपल्या नवरोबाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
दक्षिण आफ्रिकेच्या स्टार क्रिकेटरची पत्नी हॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देणारी अशीच आहे. बऱ्याचदा ती स्टेडियमममध्ये उपस्थितीत राहून मार्करमला चीअर करताना दिसून आले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्यावर तिने मार्करमला मैदानात किस करत विजयाचा आनंद साजरा केल्याची गोष्ट चांगलीच चर्चेत आली होती.
मार्करमची पत्नी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ही जोडी अनेकदा रोमँटिंग अंदाजात एकमेकांवरील प्रेम दाखवून देताना दिसते.
शाळेपासून एकमेकांना ओळखत असेलल्या या जोडीनं १० वर्षांपेक्षा अधिक काळ डेटिंगचा खेळ खेळल्यावर २०२२ मध्ये त्यांनी लग्न उरकले.
मार्करमची पत्नी ही एक यशस्वी उद्योजिका आहे. सध्याच्या घडीला ती स्वत:चे ज्वेलरी शॉपच्या व्यवसायातून मोठी कमाई करताना दिसते.
पण तुम्हाला माहितीये का? जवळपास ४ मिलीयन डॉलरची मालकीण असणारी निकोल ही एक वाइन टेस्टरही आहे.
निकोल ही अल्कोहोल उत्पादन कंपनीसाठी लिकर टेस्टरच्या रुपात काम करते. वाइनची टेस्ट घेऊन त्याच्या गुणवत्तेच प्रमाण ठरवण्यासाठी ती मोठी रक्कम घेते. यातून तिने कोट्यवधींची कमाई केली आहे.