Join us

Smriti Mandhana: विराटने स्मृती मंधानाला विचारले लव्ह मॅरेज करणार की अरेंज? मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:54 IST

Open in App
1 / 7

स्मृती मंधाना हिने भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये सलामीवीर म्हणून बऱ्यापैकी नाव कमावले आहे. तिच्या डावखुऱ्या फलंदाजीची तुलना ही भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याशी केली जाते. दरम्यान, फलंदाजीसोबतच स्मृती मंधाना ही तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.

2 / 7

स्मृतीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तसेच सोशल मीडियावरून तिला नेहमीच वैयक्तिक प्रश्न विचारले जात असतात. दरम्यान, सध्या स्मृतीचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या विवाहाबाबत विचारण्याच आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.

3 / 7

स्मृती मंधानाला विराट नवीन नावाच्या युझरने विचारले होते की, ती लव्ह मॅरेज करणार आहे की अरेंज मॅरेज? त्यावर स्मृती मंधानाने धमाल उत्तर दिले आहे.

4 / 7

स्मृती मंधाना या युझरला उत्तर देताना म्हणाली की ती लव्ह-रेंजड मॅरेज करेल. याचा अर्थ मंधाना आधी प्रेम करेल. मग दोन्ही कुटुंबांची समजून घालून अरेंज मॅरेज करेल.

5 / 7

स्मृती मंधाना ही सध्या केवळ २४ वर्षांची आहे. तसेच तिच्या विवाहाला खूप वेळ आहे. सध्यातरी तिने आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले आहे. सध्या ती भारतीय महिला क्रिकेट संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे.

6 / 7

स्मृती मंधाना हिने भारतीय क्रिकेट संघासाठी ५८ एकदिवसीय, ७८ टी-२० आणि तीन कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृतीने ४१ च्या सरासरीने २२०४ धावा फटकावल्या आहेत. यात चार शतकांचाही समावेश आहे.

7 / 7

तर स्मृतीने टी-२० क्रिकेटमध्येही आपली चमक दाखवताना २५.४५ च्या सरासरीने १७८२ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये १२ अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :स्मृती इराणीभारतीय महिला क्रिकेट संघलग्न