स्मृती मानधनाचा 'चौकार'; भारतीय महिला क्रिकेटमध्ये कुणाला जमलं नाही ते तिनं करुन दाखवलं

स्मृती मानधना हिने २०१८ साली दोन वेगवेगळ्या गटातून जिंकले आयसीसीचे २ पुरस्कार

भारतीय महिला संघातील स्टार बॅटर स्मृती मानधना हिने क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडत पुन्हा एकदा आयसीसीचा पुरस्कार पटकवला आहे.

२०२४ या वर्षात सर्वोत्तम कागमगिरी केल्याबद्दल आयसीसीनं तिला बेस्ट वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित केले आहे.

२०१८ मध्ये पहिल्यांदा तिला वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच वर्षी तिने आयसीसी सर्वोच्च महिला क्रिकेटरचा पुरस्कारही पटकवला होता.

२०२१ साली देखील ती आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर अवॉर्डची मानकरी ठरली होती. यावेळीही तिला महिला गटातून बेस्ट वनडे क्रिकेटर अवार्ड मिळाला होता.

२०२४ मध्ये स्मृती मानधना हिने १३ वनडे सामन्यात ५७.४६ च्या सरासरीनं ७४७ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर तिने चौथ्यांदा आयसीसीचा पुरस्कार पटकलला.

क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करुन चार वेळा आयसीसी पुरस्कार जिंकणारी ती भारताची पहिली महिला क्रिकेटर आहे.

सध्याच्या घडीला स्मृती मानधना टीम इंडियाचा प्रमुख बॅटरपैकी एक आहे. याशिवाय तिच्याकडे उप कर्णधारपदाचीही जबाबदारी आहे.