सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

इथं एक नजर टाकुयात त्या सहा खेळाडूंवर जे वनडे वर्ल्ड कप खेळले, पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियात दिसणार नाहीत.

बीसीसीआयनं आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. मिनी वर्ल्ड कप अशी ओळख असलेल्या स्पर्धेसाठी भारतीय संघातून २०२३ चा वनडे वर्ल्ड कप खेळलेल्या ६ जणांचा पत्ता कट झाला आहे.

इथं एक नजर टाकुयात सिहाजस सहा खेळाडूंवर जे वनडे वर्ल्ड कप खेळले, पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा भाग नाहीत.

सूर्यकुमार यादव हा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता. पण या स्पर्धेच्या फायनलनंतर त्याला वनडे संघात स्थान मिळालेले नाही. २७ वनडेत ७७३ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवनं वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये १८ चेंडूत २८ धावा केल्या होत्या.

२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शार्दुल ठाकूरही टीम इंडियाचा भाग होता. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याला संधीही मिळाली. पण यावेळ तो संघाचा भाग नाही. २०२४ च्या आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्यावर त्याने देशांतर्गत क्रिकेटमधून मैदानात कमबॅक केले. पण आयसीसी ट्रॉफीसाठी त्याची निवड झालेली नाही.

आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. २०२३ वनडे वर्ल्डकपचा सलामीच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. ही त्याची शेवटची वनडे मॅच ठरली.

डावखुरा विकेट किपर बॅटर इशान किशन हा देखील २०२३ वनडे वर्ल्ड कप संघाचा भाग होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतल्यापासून त्याला टीम इंडियात संधीच मिळालेली नाही.

मोहम्मद सिराज हा तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा भाग राहिला आहे. तो वनडे वर्ल्ड कपही खेळला. पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात त्याला संधी मिळालेली नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षेर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा.