भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने बर्मिंगहॅमच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसरे शतक साजरे करत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात गिलनं शतकी खेळीत आणखी मोठी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
यासह तो SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या कर्णधारांच्या यादीतही सामील झालाय.
इंथ एक नजर टाकुयात SENA देशांत भारतीय संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांवर
टीम इंडियाचे नेतृत्व करताना १९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीन याने ऑकललंड कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध १९२ धावांची खेळी केली होती.
याच वर्षी म्हणजे १९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीन याने इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर कसोटीत १७९ धावांची खेळी केली होती.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व करताना केपटाउनच्या मैदानात १६९ धावांची खेळी साकारली होती.
विराट कोहलीनं २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सेंच्युरीयन कसोटी सामन्यात १५३ धावांची खेळी केली होती.
शुबमन गिलनं बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी करताना या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. द्विशतकासह तो या यादीतील नंबर वन कर्णधार होऊ शकतो.