टीम इंडियानं कोच गौतम गंभीर यांना दिलं स्पेशल बर्थडे गिफ्ट; इथं पाहा खास फोटो

गौतम गंभीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय संघाचे विद्यमान कोच गौतम गंभीर ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. बीसीसीआयसह सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील अविस्मरणीय खेळीचा क्षणासह कोहलीसोबतची खास फ्रेम शेअर करत गौतम गंभीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दोन वेळचा माजी चॅम्पियन कर्णधार आणि कोचला खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह विक्रमी विजयासह ट्रॉफी जिंकत टीम इंडियानं गौतम गंभीर यांचा बर्थडे खास केला. हे त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्टच ठरले.

कोचिंग आधी गौतम गंभीर यांनी खेळाडूच्या रुपात टीम इंडियासाठी खास योगदान दिले आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसह २०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत या क्रिकेटरनं संघाला जेतेपद मिळवून देण्याता मोलाचा वाटा उचलला होता.

आपल्या कसोटी कारकिर्दीत सलग ११ अर्धशतके झळकवण्याचा पराक्रम गौतम गंभीरनं करून दाखवला होता.

याशिवाय कसोटी क्रिकेटमद्ये न्यूझीलंडच्या मैदानात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही गंभीरच्या नावे आहे. २००९ मध्ये गंभीरनं न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यात ४३६ चेंडूत १३७ धावांची खेळी केली होती.

टीम इंडियात आता GG पर्व सुरु आहे. गौतम गंभीर आणि शुबमन गिल यांच्या नव्या पर्वातील पहिली ट्रॉफी ही गंभीर यांच्या बर्थडेच्या दिवशी आली. आता हा सिलसिला कायम ठेवत टीम इंडियात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका गाजवण्यासाठी मैदानात उतरेल.