आयपीएलच्या १८ व्या हंगामातील फायनल सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या वेळी ट्रॉफी उंचावण्याची संधी त्यांनी गमावली.
एका बाजूला श्रेसय अय्यरचे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. दुसरीकडे १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विराट कोहली आणि आरसीबीचा संघ IPL चॅम्पियन ठरला.
RCB चॅम्पियन झाल्यावर विराटचे अश्रू सर्वांना दिसले, पण पंजाबच्या संघाकडून धावांचा पाठलाग करताना ३० चेंडूत ६१ धावा करुन कमी पडल्यावर अश्रू ढाळणारा शशांक सिंह दुर्लक्षितच राहिला.
श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठानं आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शशांक खास फ्रेम शेअर करत अविस्मरणीय खेळीला दाद दिलीये.
ती फायनल सामन्यावेळी स्टेडियमवर उपस्थितीत राहून भावाच्या संघाला चीअर करताना दिसली होती. संघ उपविजेता राहिला असला तरी तुम्ही माझ्यासाठी चॅम्पियन आहात, अशी भावना व्यक्त करणारी खास फ्रेमही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये दिसून येते.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसलेल्या श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्टा ही भावाला चीअर करण्यासाठी बऱ्याच वेळा स्टेडियमवर हजेरी लावताना पाहायला मिळाले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यावेळीही ती मैदानात मिरवताना दिसली होती.
पंजाब किंग्जसाठी शेअर केलेल्या खास पोस्टमध्ये श्रेष्ठानं संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करताना हार-जीत काही असो तुम्ही माझ्यासाठी चॅम्पियन आहात, अशी भावना व्यक्त केलीये. तिची पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरतीये.
श्रेष्ठा ही सोशल मीडियावर चांगली लोकप्रिय आहे. श्रेयस अय्यरसोबत अनेकदा ती खास फोटो शेअर करतानाही दिसलीये. पण मैदानात दिसलेली ही फ्रेम एकदम खास आहे.