Join us

पालघर एक्स्प्रेस ते लॉर्ड!, घटवले १३ किलो वजन, प्रसंगी राहिला प्रशिक्षकांच्या घरी; शार्दूल ठाकूरचा थक्क करणारा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 15:41 IST

Open in App
1 / 8

Shardul Thakur Jornery : भारतीय संघाचा गोलंदाज शार्दूल ठाकूर यानं मंगळवारी इतिहास घडवला. जोहान्सबर्ग कसोटी त्यानं एका डावात ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आफ्रिकेत एका डावात ७ विकेट्स घेणारा तो पहिला आशियाई जलदगती गोलंदाज ठरला. १०० वर्षांच्या इतिहासात आफ्रिकेत दोनच जलदगती गोलंदाजांना डावात ७ विकेट्स घेता आल्या आहेत.

2 / 8

शार्दूल ठाकूरचा प्रवास हा चढ-उतारांचा राहिलेला आहे. एक काळ असा होता की आयपीएलमधील कोणतीच फ्रँचायझी त्याला खेळण्याची संधी देत नव्हती आणि आता प्रत्येक फ्रँचायझी त्याच्यासाठी बोली लावताना दिसेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या आणि आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गुंडाळला.

3 / 8

मागील एक वर्षात शार्दूलनं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी आपली छाप पाडली आहे. मुंबईहून १०० किलोमीटर दूर असलेल्या पालघर येथून आलेल्या शार्दूलचा प्रवास हा थक्क करणारा आहे. दररोज ट्रेननं प्रवास करणाऱ्या शार्दूलची सुरुवातीची ओळख ही पालघर एक्स्प्रेस अशी होती, परंतु आता तो लॉर्ड बनला आहे.

4 / 8

कारकीर्दिच्या सुरुवातीला शार्दूलचं वजन हे ८३ किलो होते. तेव्हा झहीर खाननं त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. शार्दूलनं १३ किलो वजन कमी केले आणि मुंबईच्या रणजी टीममध्ये एन्ट्री घेतली. त्यानं २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ च्या रणजी हंगामात दमदार खेळ केला आणि मुंबईला जेतेपद पटकावून देण्यात हातभार लावला

5 / 8

२०१७मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघानं त्याला करारबद्ध केले. त्यानंतर २०१८ पासून ते चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिले नाही. प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शार्दूल घडला.

6 / 8

३० वर्षीय शार्दूलनं ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्द कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. परंतु दुखापतीमुळे त्याला लवकरच मैदान सोडावं लागलं. त्यानंतर दुसरी कसोटी खेळण्यासाठी २०२१ उजाडलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका शार्दूलनं गाजवली. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर त्यानं बाजी मारली.

7 / 8

दुसरी कसोटी खेळण्यापूर्वी शार्दूलनं १५ वन डेत २२ आणि २४ ट्वेंटी-२०त ३१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पाच कसोटीत त्यानं २१ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ब्रिस्बेन कसोटीतील अर्धशतक आणि इंग्लंड दौऱ्यावरील दोन डावांत केलेली अर्धशतकी खेळीनं, शार्दूल कसोटी संघाचा महत्त्वाचा घटक बनला.

8 / 8

टॅग्स :शार्दुल ठाकूरभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App