ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याच्या मेलबर्न येथील घराचे लिलाव होणार आहे.
त्यानं आपल्या घराचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून त्याला ५० ते ५४ कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.
शेन वॉर्नच्या या घरात पाच बेडरूम, पाच बाथरूम आहेत आणि ४ एप्रिलपर्यंत हे लिलाव सुरू राहणार आहे.
वॉर्नने २०१८मध्ये इसेंडन फुटबॉल क्लबकडून ५.४ मिलियन डॉलरमध्ये हे घर विकत घेतले होते.
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार वॉर्नच्या घरात ५०० वाईन बॉटल्स आहेत, शिवाय मिनी थिएटरही आहे.
वॉर्न हे घर का विकतोय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत प्राणी-पक्षांची हानी झाली.
या आगीत 50 कोटीहून अधिक प्राणीपक्षी मृत पावले.
या अग्नीतांडवात होरपळलेल्या जिवांच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे आले.
क्रिकेटपटूंनीही आपापल्या परीनं पीडितांना मदत करण्याचा निर्धार केला आहे.
वॉर्न यानेही आपल्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. तिला ५ कोटीहून अधिक रक्कम मिळाली.