Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपच्या सात वर्षानंतरही शेन वॉर्नला सतावतेय 'हॉट' गर्लफ्रेंडची आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 17:42 IST

Open in App
1 / 5

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न हा कधी मैदानावरील कृत्यांमुळे तर कधी गर्लफ्रेंड्समुळे चर्चेत राहिला आहे. वॉर्नचं नाव अनेक मुलींशी जोडलं गेलं आणि त्यात ब्रिटिश अॅक्टर एलिजाबेथ हर्ले हिचाही समावेश होता. वॉर्न आणि एलिजाबेथ यांच नात बरीच वर्ष टिकलं. म्हणूनच ब्रेकअपच्या सात वर्षांनंतरही वॉर्नला तिची आठवण सतावत आहे.

2 / 5

वॉर्न आणि एलिजाबेथ यांचं प्रेम प्रकरण 2010मध्ये सुरू झालं. त्यानं सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011मध्ये त्यांनी साखरपुडा केला. पण, दोन वर्षांनंतर त्यानी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

3 / 5

वॉर्ननं Fox या मीडियाशी बोलताना सांगितले की,''एलिजाबेथसोबत ब्रेकअप केल्याचं दुःख आजही आहे आणि तिची चिंता वाटते. ती पहिल्यांदा जेव्हा ऑस्ट्रेलियात आली तेव्हा आमचं नातं घट्ट झालं नव्हतं आणि म्हणूनच तिची भेट माझ्या मुलांशी नाही करून दिली. जेव्हा या नात्याबाबत आम्ही दोघंही सीरिअस झालो तेव्ह मी तिची मुलांशी ओळख करून दिली.''

4 / 5

याबरोबर वॉर्ननं पहिली पत्नी सिमोन कालाहानला फसवल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. या दोघांनी 1995 मध्ये लग्न केलं आणि 2005 मध्ये वेगळे झाले. दोघांना तीन मुलं आहेत. ज्या मुलीसाठी वॉर्ननं सिमोनला धोका दिला, तिच्यासोबतचं नातं फार काळ टिकलं नाही. या नात्यानंतर वॉर्नच्या आयुष्यात एलिजाबेथ आली.

5 / 5

सेक्स स्कँडलमुळे त्याचं पहिलं लग्न तुटलं आणि त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे उप कर्णधारपदही गमवावे लागले. 2000मध्ये त्याचं ब्रिटिश नर्ससोबत अनैतिक संबंध उघड झाले. 2005मध्ये त्याचं एका तीन मुलांच्या आईशी संबंध असल्याची चर्चा रंगली होती.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया