Join us  

IPL 2019 मध्ये बनलेले 'हे' सात विक्रम मोडणे अशक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:19 PM

Open in App
1 / 8

इंडियन प्रीमिअर लीगचा 12वा हंगाम अजून निम्म्या टप्प्यावरही आलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 23 सामन्यांत अनेक नवीन विक्रमांची नोंद झाली आणि काही विक्रम मोडलेही. पण, या हंगामात असे काही विक्रम बनले ते मोडणे कदाचित शक्य नाही. अशाच सात विक्रमांबद्दल आपण जाणून घेऊया...

2 / 8

सर्वोत्तम गोलंदाजी - 2008 मध्ये पाकिस्तानचा गोलंदाज सोहेल तन्वीरने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 14 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमधली ही सर्वोत्तम गोलंदाजी होती. मात्र, 11 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सच्या जोसेफ अल्झारीने हा विक्रम नावावर केला. आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात अल्झारीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 3.4 षटकांत 12 धावांत 6 विकेट घेतल्या.

3 / 8

दोन्ही सलामीवीरांचे शतक - आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाच्या सलामीवीरांनी एकाच सामन्यात शतक झळकावण्याचा विक्रम प्रथमच घडला. सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक शतकी खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 185 धावांची भागीदारीही केली. वॉर्नरने 55 चेंडूंत 100, तर बेअरस्टोने 56 चेंडूंत 111 धावा केल्या.

4 / 8

पदार्पणाच्या षटकात सर्वाधिक धावा - आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या वरुण चक्रवर्तीने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा देण्याचा लाजीरवाणा विक्रम नावावर केला. पंजाबने 8.4 कोटी रुपयांत वरुणला आपल्या ताफ्यात घेतले होते आणि सात वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्यात तो तरबेज आहे. पण, कोलकाता नाइट रायडर्सच्या सुनील नरीनने त्याच्या पहिल्याच षटकात 25 धावा चोपल्या.

5 / 8

युवा पदार्पणवीर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्रयास रे बर्मनने आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा मान मिळवला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रयासने 16 वर्ष 157 दिवसांचा असताना पदार्पण केले. त्याने पंजाबच्या मुजीब उर रहमानचा ( 17 वर्ष व 11 दिवस) विक्रम मोडला.

6 / 8

सर्वात कमी वयात हॅटट्रिकची नोंद - किंग्स इलेव्हन पंजाबच्या सॅम करनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला. सॅम करनने 20 वर्ष 302 दिवसांचा असताना हॅटट्रिक घेतली, तर रोहितने 2009 साली 22 वर्ष 6 दिवसांचा असताना हॅटट्रिक घेतली होती.

7 / 8

पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी - मुंबई इंडियन्सच्या जोसेफ अल्झारीने पदार्पणातच 12 धावांत 6 विकेट घेतल्या. त्याने अँड्य्रू टायचा 2017 सालचा विक्रम मोडला. टायने 17 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

8 / 8

सलग तीन शतकी भागीदारी - सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या सलामीवीरांनी आयपीएलमध्ये सलग तीन सामन्यांत शतकी भागीदारीचा विक्रम नावावर केला आहे.

टॅग्स :आयपीएल 2019सॅम कुरेनडेव्हिड वॉर्नरमुंबई इंडियन्स