ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने सरावासाठी पर्थ येथे तळ ठोकले आहे. काल एक सराव सामना खेळल्यानंतर भारतीय खेळाडू आज फेरफटका मारायला बाहेर पडले.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस आहे आणि टीमसोबत केक कापून तो साजरा केला.
रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल यांचा वेगळाच स्वॅग यावेळी पाहायला मिळाला.
लोकेश राहुल, विराट कोहली व हार्दिक पांड्या यांच्या स्टाईलने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली.
आर अश्विन, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, रोहित शर्मा व युजवेंद्र चहल यांनी ऑस्ट्रेलियाच्या समुद्राचा बोटीने प्रवास करून आनंद लुटला.
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस हेही सोबत दिसले.
चेतन सकारिया व मुकेश चौधरी हे नेट बॉलर म्हणून भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.
रोहित शर्माचा स्वॅग...