Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन तेंडुलकरच्या संगीत कार्यक्रमात 'करवली' सारा तेंडुलकरच्या खास लूकची चर्चा (PHOTOS)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:13 IST

Open in App
1 / 8

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर येत्या ५ तारखेला सानिया चांडोक हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. त्याआधी संगीत सोहळ्यासाठी संपूर्ण तेंडुलकर व चांडोक परिवाराने पारंपरिक पोशाखात एकत्रित हजेरी लावली.

2 / 8

या फोटोमध्ये अर्जुनची 'करवली' सारा तेंडुलकर हिच्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या. तिने अत्यंत सुंदर आणि पारंपरिक लेहेंगा-चोली परिधान केल्याचे दिसले. हा पेहराव विशेषतः 'कच्छी एम्ब्रॉयडरी'च्या शैलीने प्रेरित वाटतो.

3 / 8

साराने गडद जांभळ्या (Burgundy/Wine) रंगाचा लेहेंगा परिधान केला असून त्यावर अतिशय बारीक आणि रंगीबेरंगी धाग्यांचे नक्षीकाम (Embroidery) आहे. यात आरशांचे काम (Mirror work) प्रामुख्याने दिसून येते, जे त्याला पारंपरिक लूक देते.

4 / 8

साराने लेहेंग्याला साजेसा नक्षीकाम केलेला ब्लाउज म्हणजेच चोली परिधान केली आहे. या चोलीची नेकलाइन पारंपरिक नेकलाइनपेक्षा काहीशी वेगळी आहे. या चोलीच्या बाह्यांवरही आरसे आणि मण्यांचे बारीक शिवणकाम करण्यात आले आहे.

5 / 8

साराच्या ओढणीच्या एका बाजूला हिरव्या रंगाची बॉर्डर असून त्यावरही मोठे आरसे (Mirror work) आणि गोंडे (Tassels) लावलेले आहेत, ज्यामुळे पेहरावात एक वेगळ्या प्रकारचा 'कॉन्ट्रास्ट' निर्माण झाला असून पेहराव उठावदार झाला आहे.

6 / 8

सारा तेंडुलकरने जड नक्षीकाम असलेला 'नवलखा' हार घातला आहे. या हाराला मल्टीलेयर कुंदन सेट स्टाईल हार असेही म्हटले जाते. हेवी एम्ब्रॉडरी असलेल्या चोलीवर हा मल्टी लेयर हार घातल्याने तो तिच्या गळ्याला पूर्णपणे शोभून दिसतोय.

7 / 8

या संपूर्ण लूकला पारंपरिक टच देण्यासाठी तिने कपाळावर एक नाजूक, पण ठळक असा मांग टिका लावला आहे, जो तिच्या हेअरस्टाईलला सूट करतो. सोबतच तिने ड्रेसला मॅचिंग बांगड्या आणि 'कडे' घातले आहे.

8 / 8

संगीतसाठी तिने केसांचा एक 'स्लीक बन' (Sleek Bun) बांधला आहे. यामुळे दागिने आणि फीचर्स उठून दिसतात. सोबत हलका मेकअप (Dewy makeup) केलाय. फिकट लिपस्टिक आणि हातावरील मेहंदीने पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.

टॅग्स :सारा तेंडुलकरअर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकरशुभविवाहलग्न