Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजू सॅमसनला मोठा डाव साधण्याची संधी; मसल पॉवर रसेलसह लॉर्ड पोलार्ड अन् गेलचा विक्रम धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 17:55 IST

Open in App
1 / 10

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाकडून 'बाहुबली' शो दाखवून देणारा संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्सला सहावी IPL ट्रॉफी जिंकून देण्यासाठी जोर लावणार आहे.

2 / 10

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून नव्या इनिंगची सुरुवात करताना तो संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

3 / 10

CSK च्या संघाकडून मैदानात उतरणाऱ्या संजूला यंदाच्या हंगामात आंद्रे रसेल, केरॉन पोलार्ड आणि ख्रिस गेल या दिग्गजांना मागे टाकण्याची संधी असेल. इथं जाणून घेऊयात त्याला खुणावणाऱ्या खास रेकॉर्ड बद्दल

4 / 10

संजू सॅमसन याने आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीत १७७ सामन्यात ४७०४ धावा केल्या आहेत. यात ३ शतकांसह २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

5 / 10

यंदाच्या हंगामात संजूला ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेलन १४२ सामन्यात ४९६५ धावा केल्या आहेत. २६२ धावा करताच संजू कॅरेबियन स्टारला ओव्हरटेक करेल.

6 / 10

IPL मध्ये ५००० धावा करणाऱ्या मोजक्या फलंदाजांमध्ये एन्ट्री मारण्याचीही संजूकडे संधी आहे. यासाठी त्याला यंदाच्या हंगामात फक्त २९६ धावा करायच्या आहेत. सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो हा पल्ला अगदी सहज गाठेल, असे वाटते.

7 / 10

संजू सॅमसन याने IPL मध्ये १७७ सामन्यात २१९ षटकार मारले आहेत. यंदाच्या हंगामात ५ षटकार मारताच तो पोलार्ड आणि आंद्रे रसेलच्या पुढे निघून जाईल,

8 / 10

केरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल या दोघांनीही IPL मधील आपल्या कारकिर्दीत प्रत्येकी २२३-२२३ षटकार ठोकले आहेत.

9 / 10

संजू सॅमसन यंदाच्या हंगामात १८ षटकार मारले तर तो डेविड वॉर्नरलाही मागे टाकेल. वॉर्नरन आपल्या IPL कारकिर्दीत २३६ षटकार मारले आहेत.

10 / 10

राजस्थानचा संघ सोडून CSK च्या ताफ्यातून खेळताना तो चॅम्पियन होणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्ससंजू सॅमसनआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग