टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि प्रतिभावान यष्टीरक्षक संजू सॅमसन याने आपल्या पत्नीसोबत ओणम सण साजरा केला.
संजू सॅमसनने सोशल मीडियावर पत्नी चारूलता रमेश हिच्यासोबत काही खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या.
संजू सॅमसन आणि चारुलता रमेश या दोघांची पहिली भेट तिरुअनंतपुरममधील मार इव्हानिओस कॉलेजमध्ये झाली होती.
त्या भेटीनंतर संजूने चारूलताला फेसबुकवर अकाउंटवर मेसेज केला. ऑगस्ट २०१२ पासून त्यांची फेसबुकवरून मैत्री सुरू झाली.
याच मैत्रीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले. लग्नाआधी संजू आणि चारुलता यांनी एकमेकांना सुमारे ५ वर्षे डेट केल्याचे म्हटले जाते.
संजू आणि चारुलता यांचे डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाले. लग्नाला फक्त संजूचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
चारूलताच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता की नव्हता, याची अधिकृत माहिती कुठेही नाही. पण तिच्या घरचे लग्नाला उपस्थित नव्हते.
संजू सॅमसन हा ख्रिश्चन कुटुंबातील आहे. तर त्याची पत्नी चारुलता हिंदू कुटुंबातील आहे. या दोघांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत.