भारतीय संघातील स्टार विकेट किपर बॅटर संजू सॅमसन याने क्रिकेटमध्ये आपली खास छाप सोडली आहे. क्रिकेटच्या मैदानात खास खेळी करुन धमक दाखवणाऱ्या या क्रिकेटरची फिल्ड बाहेरील लव्हस्टोरीही एकदम झक्कास आहे.
संजू सॅमसन याच्या पत्नीचं नाव चारुलता असं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती संजूसोबतचे खास फोटो शेअर करत दोघांमधील खास बॉन्डिंगची झलक दाखवून देत असते.
चारुलता हिला पाहताच संजू सॅमसन तिच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला. पण लाजाळू स्वभावामुळे तो तिच्याशी थेट बोलला नाही.
प्रेमाची इनिंग सुरु करण्यासाठी संजूनं फेसबूकचा आधार घेतला. फ्रेंडरिक्वेस्ट स्विकारल्यावर संजूनं २२ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी चारुलता हिला फेसबूकवर पहिला मेसेज पाठवला होता.
संजूनं पहिलं पाऊल उचललं, पण तिनं काही त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. मग संजूनं थेट तिची भेट घेत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. अन् प्रेमाचा खेळ सुरु झाला.
संजूनं पहिलं पाऊल उचललं, पण तिनं काही त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. मग संजूनं थेट तिची भेट घेत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. अन् प्रेमाचा खेळ सुरु झाला.
जवळपास पाच वर्षे एकमेकांसोबत डेटिंग केल्यावर २२ डिसेंबर २०१८ रोजी संजू आणि चारुलत ही जोडी विवाहबंधनात अडकली.
११ नोव्हेंबरला संजू आपला बर्थडे साजरा करतो. ३१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चारुलता हिने खास पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.