Join us
Daily Top 2Weekly Top 5

PHOTOS: धोनीच्या लेकीचं लेटेस्ट फोटोशूट; वडिलांच्या पावलावर पाऊल, पाहा झिवा सिंगची भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:16 IST

Open in App
1 / 7

महेंद्रसिंग धोनीप्रमाणे त्याची मुलगी झिवा देखील खूप प्रसिद्ध आहे. 7 वर्षीय झिवा धोनीचे इस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. मात्र, जीवाचे इन्स्टाग्राम अकाउंट तिची आई साक्षी सिंग धोनी सांभाळते. तिच्या इस्टाग्रामवरून लेटेस्ट फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

2 / 7

झिवा सिंग धोनीच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ आणि दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये झिवा तिच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.

3 / 7

झिवा सिंग धोनीचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात महेंद्रसिंग धोनीची पहिली झलक पाहायला मिळत आहे. झिवा तिच्या वडिलांप्रमाणेच पाळीव कुत्र्यांवर खूप प्रेम करते.

4 / 7

जेव्हा धोनी इस्टाग्रामवर सक्रिय होता तेव्हा तो अनेकदा त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत फोटो शेअर करायचा. धोनी आपल्या पाळीव कुत्र्यांवर प्रेम करताना आणि त्यांना प्रशिक्षण देत असताचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असे.

5 / 7

मात्र, आता धोनी सोशल मीडियापासून बऱ्याच कालावधीपासून दूर आहे. मात्र झिवाचे हे नवे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात धोनीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. धोनीची पत्नी साक्षी अनेकदा चाहत्यांसाठी सोशल मीडियावर धोनीशी संबंधित फोटो आणि अपडेट्स शेअर करत असते.

6 / 7

झिवा धोनीच्या इस्टाग्रामवर तिची आई साक्षी नेहमी रांचीतील फार्महाउसचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये झिवा केवळ पाळीव कुत्र्यांशीच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांशीही खेळत असल्याचे पाहायला मिळते.

7 / 7

झिवा आपल्या वडिलांप्रमाणे महान फुटबॉलर लिओनेल मेस्सीची फॅन आहे. अलीकडेच अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर झिवाला मेस्सीकडून स्वाक्षरी असलेली जर्सी भेट मिळाली होती. झिवाकडून मिळालेल्या या गिफ्टचे फोटो इस्टाग्रामवर शेअर करताना साक्षी धोनीने लिहिले, 'जसा बाप, जसा मुलगी.'

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीजीवा धोनीभारतीय क्रिकेट संघ
Open in App